Latest Marathi News Live Update
esakal
फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या प्रचंड नुकसानीवर अजूनही योग्य ती मदत मिळाली नसल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. शनिवारी (ता.४) सुट्टीच्या दिवशी तहसील कार्यालयात २०२४ च्या अनुदानाच्या याद्या अद्यावत करण्याचे काम सुरू होते. यावेळी काँग्रेसचे जगन्नाथ काळे, तालुकाध्यक्ष संतोष मेटे, युवकचे माजी जिल्हाध्यक्ष वरून पाथ्रीकर, सरपंच अंबादास गायके, सोसायटी चेअरमन बाबुराव डकले, मुदतसर पटेल, प्रशांत नागरे, सदाशिव विटेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दालनात धडक देत तहसीलदार योगिता खटावकर यांना आक्रमकपणे भूमिका मांडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.