शिक्रापूर : नोकरीच्या निमित्ताने शिक्रापुरात (ता. शिरूर) आपल्या कुटुंबीयांसमवेत राहायला आलेल्या महिलेची ओळख वाढवून तिच्या घरी जाऊन तिच्यावर येथील प्रथमेश उर्फ समर्थ संतोष सासवडे (वय २१, रा. बजरंगवाडी- शिक्रापूर) याने लैंगिक अत्याचार केला. याबाबत बाहेर कुठे बोललीस तर पती व मुलांना ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. याबाबत पीडितेच्या फिर्यादीनंतर त्याच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती फौजदार विजय मस्कर यांनी दिली.