विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेल्या राजू शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपमधून राजू शिंदे यांनी ९ नगरसेवकांसह उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा सर्व समर्थकांसह राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांनी उद्धव ठाकरेंकडं पाठवलं आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, ते पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.