लंब्री तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर–फुलंब्री रस्त्यावरील चौका घाटाच्या परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. ३१) रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.