Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updates esakal

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 1 October 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Published on

Ramdas Kadam Live: राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज चांदिवली येथील लुंबीनी बुद्ध विहाराचे उद्घाटन

आरपीआय अध्यक्ष आणि केंद्राचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज चांदिवली येथील लुंबीनी बुद्ध विहाराचे उद्घाटन पार पडले.आमदार दिलीप लांडे यांच्या निधीतून हे भव्य दिव्य बुद्ध विहार बांधण्यात आले आहे.या उद्घाटन प्रसंगी रामदास आठवले यांनी माध्यमाशी संवाद साधला. या वेळी त्यानी जागावाटप मध्ये आठ दहा जागा मिळाव्यात, मुंबईत एखादी जागा मिळावी तसेच अमित शहा यांच्या मते बहुमताने २०१९ प्रमाणे सरकार येईल असे असून त्यात शिंदे अजित पवार आम्ही असून महायुतीचे सरकार असेल अशी प्रतिक्रिया दिली.

Sandip Shinde Committee Live: मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक

उद्या मंत्रालयामध्ये सकाळी 11 वाजता मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे... शिंदे यांचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारल्यानंतर उद्याची बैठक महत्त्वाची असेल. खास करून कुणबी प्रमाणपत्र बद्दल काय निर्णय होईल? हे पाहणं महत्त्वाचे असेल.

Amit Shah Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठकीपूर्वी दोन नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे.

Yek Number Movie Live: अभिनेत्री मलाइका अरोडा हिच्या नृत्यावर "येक नंबर "; पाहा व्हिडिओ

Mumbai Live: मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

संध्याकाळी गर्दीच्या वेळीच मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरबाबात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण समोर येत आहे. त्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला आहे. यामुळे प्रवाशांचीही गैरसोय होत आहे.

Mumbai Live: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतील वाडीबंदर कोचिंग डेपोची केली तपासणी

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईतील वाडीबंदर कोचिंग डेपोची सर्वसमावेशक तपासणी केली आहे. त्यांनी प्रवाशांची सुरक्षा, स्वच्छता आणि सेवेची विश्वासार्हता पाहून पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि भविष्यातील विस्तार योजनांचा आढावा देखील घेतला.

Maharashtra Live: राज ठाकरे ऑक्टोबरमध्ये संभाजीनगर, नाशिक अन् पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ ऑक्टोबर रोजी संभाजीनगर, ६ ऑक्टोबर रोजी नाशिक आणि ७ ऑक्टोबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दौरे होणार आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांनी विदर्भ, मराठवाडा दौरा केला आहे. विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिल्यानंतर राज ठाकरे सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरे करत आहेत. यंदा २२५ ते २५० जागा लढवण्याचा मनसेचा निर्धार आहे.

Pune Live : पुण्यात पाणाच्या डबक्यात पडून तरुणाचा मृत्यू

पुण्यात पाणाच्या डबक्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. खडकवासला धरणाजवळ ही दुर्घटना घडली आहे. मयूर नायडू असं मृत्यू पावलेल्या १७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. आज दुपारी १ ते २ वाजण्याच्या सुमारास घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सध्या खडकवासला धरणाजवळ असलेल्या पाण्यात अनेक जणं कपडे धुण्यासाठी जात आहेत. आज दुपारी नायडू हा त्या ठिकाणी गेला होता. तिथेच जवळ असलेल्या डबक्यात तो उतरला मात्र, अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. बचाव कार्यासाठी अनेक पथकं त्याठिकाणी दाखल झाली होती. मात्र, काही वेळाने त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. उत्तमनगर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

Amit Shah Live : कार्यकर्त्यांशी संवादानंतर अमित शहांची कोअर कमिटीशी चर्चा

कार्यकर्त्यांशी संवाद झाल्यानंतर आता अमित शहा आता कोअर कमिटीशी चर्चा करत आहेत. मुंबईतील जागा वाटपासंदर्भात कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये महायुतीत जागा वाटपात भाजपा किती जागा लढवणार यासंदर्भात चर्चा झाली.

NCP Live: पक्षचिन्हाबाबत आजही सुनावणी नाहीच

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही. आता या प्रकरणी १५ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. आज कोर्टाचे कामकाज ३ वाजता संपल्याने प्रकरण सुनावणीसाठी आलं नव्हतं.

यशवंत सहकारी साखर कारखान्याची ११७ एकर जमीन विक्रीला

गेली तेरा वर्ष बंद राहून कर्जबाजारी झालेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ११७ एकर जमीन विक्री करण्याचा प्रस्ताव कारखान्याने कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्राद्वारे दिला आहे. यासाठी २०१२ मध्ये झालेल्या वार्षिक सभेतील ठरावाचा आधार घेण्यात आला आहे. दरम्यान, या प्रस्तावास काही संचालकांनी विरोध केला असून नव्याने वार्षिक सभा घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे सभासदांमध्ये उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे.

Shiv Sena Live: शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये

दसरा मेळाव्यासाठी शिवसेना शिंदे गटाने बीकेसीतील मैदान निश्चित केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणारा हा तिसरा दसरा मेळावा आहे. मेळाव्यासाठी तब्बल 40 हजार शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आझाद मैदान इथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, तर पहिला मेळावा बीकेसी इथे पार पडला होता.

Shigeru Ishiba Japan’s new Prime Ministe live Updates: शिगेरू इशिबा यांची जपानचे 102 वे पंतप्रधान म्हणून नियुक्ती

शिगेरू इशिबा यांची जपानचे 102 वे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Sambhaji Raje live Updates: माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेली स्वराज्य संघटना राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेली स्वराज्य संघटना आता भारतीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावानं एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झाला. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला सप्तकिरणांसह पेनाची नीब हे निवडणूक चिन्ह प्राप्त

India vs Bangladesh Live 2nd Test: बांग्लादेशचं भारतासमोर विजयासाठी ९५ धावांचं आव्हान

कानपूर इथल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात बांग्लादेशचं भारतासमोर विजयासाठी ९५ धावांचं आव्हान.

PM Narendra Modi live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमैकाचे पंतप्रधान डॉ. अँड्र्यू हॉलनेस यांचं हैदराबाद हाऊस इथं केलं स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमैकाचे पंतप्रधान डॉ. अँड्र्यू हॉलनेस यांचं हैदराबाद हाऊस इथं केलं स्वागत. जमैकाचे पंतप्रधान डॉ. अँड्र्यू हॉलनेस यांनी नवी दिल्ली इथं 'जमैका मार्ग' नावाच्या रस्त्याचं केलं उद्घाटन.

Amit Shah LIVE: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी मुंबई येथील संघ कार्यालयाला भेट देणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री पावणे आठ ते पावणे नऊच्या दरम्यान नवी मुंबईतील संघ कार्यालयाला भेट देणार आहेत. या भेटीमध्ये ते संघाचे पदाधिकारी आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करतील. यावेळी ते एक महत्त्वपूर्ण बैठक देखील घेणार असून, संघाच्या विविध योजनांवर आणि भविष्यातील कार्यक्रमांवर चर्चा केली जाणार आहे.

Dhangar Reservation Live : शिंदे समितीकडून धनगर आरक्षणाच्या संदर्भातील अहवाल आज सरकारकडे होणार सुपूर्द

शिंदे समितीकडून आज धनगर आरक्षणाच्या संदर्भात अहवाल सरकारकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. हा धनगर आरक्षणाचा अहवाल ओबीसी मंत्रालयाच्या सचिव विनिता सिंघल यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. सुधाकर शिंदे यांच्या ९ जणांच्या समितीने ९ महिने ५ राज्यात जाऊन धनगर आरक्षणच्या संदर्भात अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. आज हा अहवाल शिंदे समितीकडून ओबीसी मंत्रालयाच्या सचिव विनीता सिंघल यांना सुपूर्द करण्यात येईल.

Rahul Gandhi Live : राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा कोर्टाचे समन्स

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा कोर्टाने समन्स बजावले आहे. स्वतंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून हे समन्स पाठवण्यात आले आहे,.

Sambhajiraje Live : संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाची पक्ष म्हणून मान्यता

संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून भारत निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुका लढवणार आहे. तर निवडणूक लढवण्यासाठी सप्त किरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह मिळाले असल्याची संभाजी राजे यांनी सांगितले आहे

Jammu And Kashmir Live: जम्मू-काश्मीर सकाळी 9 पर्यंत 11.60 टक्के मतदान

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ४० जागांवर मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजेपर्यंत 11.60 टक्के मतदान झाले आहे.

Lebenon Live: लेबनॉनमध्ये इस्त्रायलकडून लष्करी कारवाई; 94 जणांचा मृत्यू

लेबनॉनमध्ये ऑपरेशन नॉर्दन एरोच्या माध्यमातून इस्त्रायलकडून प्रत्यक्ष जमिनीवरील लष्करी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत 94 जणांचा मृत्यू झाल्याचा लेबनॉनचा दावा .

Mumbai Local LIVE : 5 ऑक्टोबरपासून दादरवरून सुटणार जलद लोकल, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दादरवरून कर्जत आणि कसारा मार्गावर जलद लोकल सोडण्यात येणार आहे, त्यामुळे या मार्गावरून कर्जत आणि कसाऱ्याकडे प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होईल. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात ५ ऑक्टोबरपासून बदल करण्यात येणार आहे. ५ ऑक्टोबरपासून २० लोकल सीएसएमटीऐवजी दादरवरून सोडण्यात येणार आहे.

Weather Alert : पुढील 48 तासांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

आजपासून पुढील ४८ तास कोकणातील सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे नगर, पुणे, सातारा, बीड, धाराशिव, लातूरमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगलीत आज जोरदार पावसाचा अंदाज असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. दरम्यान, पुढील काही दिवसही या भागात पावसाची शक्यता आहे.

Ajit Pawar LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज परळीत

परळी वैजनाथ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज शहरात येणार असून यानिमित्ताने लाडक्या बहिणींच्या वतीने अजित पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींच्या सशक्तिकरणाच्या दृष्टीने, तसेच परळी मतदारसंघासह जिल्ह्यातील लाडक्या बहिणींशी, नागरिकांशी संवाद साधण्यासाठी अजितदादांसह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Jammu Kashmir Elections 2024 Phase 3 Voting Live : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात ४० जागांवर ४१५ उमेदवार नशीब अजमावत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये कोणाचे सरकार स्थापन करायचे हे निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातच ठरणार आहे. या टप्प्यात 39 लाखांहून अधिक मतदार मतदान करणार आहेत.

Laxman Hake LIVE : लक्ष्मण हाकेंच्या तक्रारीवरून २० ते २५ मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता, प्राथमिक अहवालात त्यांनी दारु पिलेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढलाय. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्याचा अहवाल येण्यासाठी आणखी एक-दोन दिवस लागू शकतात. दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून २० ते २५ मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, हाके यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सविस्तर इथे क्लिक करुन वाचा..

लडाखच्या समस्यांवर आवाज उठवणाऱ्या सोनम वांगचुकसह 130 समर्थकांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

लडाखच्या समस्यांवर आवाज उठवणाऱ्या सोनम वांगचुकसह 130 समर्थकांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी रात्री (30 सप्टेंबर 2024) सिंघू सीमेवर ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दिल्लीच्या सीमेवर बीएनएसचे कलम 163 लागू करण्यात आले आहे. त्याचवेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या कारवाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Rahul Gandhi LIVE : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवार, शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवार (ता. ४) आणि शनिवारी (ता. ५) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्याचदिवशी सायंकाळी सहाला कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बहुशस्त्राधारी पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी शहरातील ८१ प्रभागांमध्ये आतिषबाजी होणार आहे.

Actor Rajinikanth LIVE : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना रुग्णालयात करण्यात आलं दाखल

तामिळनाडू : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री उशिरा चेन्नईतील अपोलो ग्रिम्स रोड रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

CM Eknath Shinde LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर

Latest Marathi Live Updates 1 October 2024 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते कणेरी मठ येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, काही काळ ते सांगली दौऱ्यावरही असणार आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाचा गौरव करताना केंद्र सरकारने त्यांना भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च मानला गेलेला ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर केला आहे. आठ ऑक्टोबरला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्रिमंडळाने दोन तास चाललेल्या बैठकीत तब्बल ४९ महत्त्वाचे निर्णय घेतलेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवार (ता. ४) आणि शनिवारी (ता. ५) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. सन २०२२-२३ या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता १०० रुपये व ५० रुपये देण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली. याबाबत साखर आयुक्तांना तसा आदेश सोमवारी (ता. ३०) देण्यात आला. गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. तर, अजित पवार जनसन्मान यात्रेनिमित्त माजलगाव आणि परळी दौऱ्यावर असणार आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीचा मॅरेथॅान बैठकीचा दुसरा दिवस आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आजच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.