कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी बस चालक आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. या अपघाताला बसमधील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचा दावा करत संजय मोरेने जमिनीची मागणी केली होती. संजय मोरेच्या जामीनाला पोलिसांनी विरोध केला होता. मोरेला जर जामीन मंजूर केला तर तो पळून जाऊ शकतो अशी भीतीही पोलिसांनी व्यक्त केली होती. बसमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचा आरटीओचा अहवाल पोलिसांनी कोर्टात सादर केला होता. ९ डिसेंबरला झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला होता तर ४२ जण जखमी झाले होते.