मुंबईत झोपडीधारकांना एस आर ए च्या माध्यमातून खाजगी विकासकाकडून पुनर्विकासामध्ये इमारतीत घर दिले जाते. मात्र मुंबईच्या अनेक एस आर ए प्रकल्पात आजही हजारो नागरिक घर आणि भाड्यापासून वंचित आहेत. घाटकोपर मधील अशाच एका पुनर्विकास प्रकल्पात 2018 पासून पात्र ठरवूनही झोपडीधारकाला विकासक डागा यांनी भाडे दिलेच नाही, शिवाय सदनिका देखील दिली नाही. या विरोधात झोपडीधारकाने वारंवार एस आर ए कार्यालयात पत्र व्यवहार देखील केला. मात्र त्यांच्या पत्राला कायमच केराची टोपली दाखवण्यात आली.
अखेरीस 5 जून रोजी झोपडीधारकाने समाजसेवक संदीप वैद यांना सोबत घेऊन एस आर ए मध्ये धाव घेतली यावेळी समाजसेवक वैद यांनी एस आर ए कार्यालयात थेट स्वतःची कपडे उतरवत अनोखे आंदोलन केले. मात्र वैद यांच्या या अचानक केलेल्या कृतीमुळे एस आर ए कार्यालयात एकच गोंधळ एस आर ए तील अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांनी वैद यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र वैद्यांनी सुरक्षारक्षकांना जुमानता पीडित झोपडीधारकांच्या अन्याय विरोधात आवाज उचलला.