राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट गँगस्टर अनमोल विष्णू याच्या निर्देशानुसार रचण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने केलेल्या तपासानंतर एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील दोन आरोपी सलमान इक्बाल बोहरा (३०) आणि प्रदीप दत्तु ठोकर (३१) यांनी विशेष मोक्का न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. कोर्टाना त्यांना जामीन नाकारला आहे.