नाशिक शहरातील विविध भागातील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे नाशिककरांकडून अनेक दिवसांपासून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. परंतु महापालिकेकडून कोणताही निर्णय न घेतल्यामुळे छावा क्रांतिवीर सेनेकडून हातात डांबर, खडी मुरुम, सिमेंट आणि प्रतीकात्मक JCB घेऊन महानगरपालिकेसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुढील ७ दिवसांत शहरातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.