Latest Marathi News Update : दिवसभरातील बातम्या वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News Updates 11 January 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest marathi news

Latest marathi news

esakal

Updated on

Raj Thackeray : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

कुठे चाललीय बुलेट ट्रेन? तिचं शेवटचं स्टेशन गुजरातमध्ये आहे. डोलेरा नावाचं एक शहर अहमदाबादपासून जवळ उभा केलं जातंय. तिथं वेदांता आणि फॉक्सकॉनचे दीड लाख कोटींचे प्रोजेक्ट येतायत. एकदा वसई-विरारपासून जाऊन बघा. तुम्हाला घरं नाकारणार, बाहेरून येणाऱ्यांना मिळणार. तुम्हीच नसाल तर चाटायच्या आहेत महानगरपालिका? काय उपयोग आहे या गोष्टींचा? पैसे फेकले की विकला जातो ही आपली किंमत, दुसऱ्यांच्या हातावर बसून आमचे लोक हे आमच्या लोकांना फोडतायत, काय हे दुर्दैव. ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर कायमचे मुकलात. आज तुमच्या हातातून ही शहरं गेली तर तुम्हाला तक्रारही कुठं करता येणार नाही. इतर राजकीय पक्षातील लोकांना आवाहन आहे, मराठी माणसासाठी एक व्हा, मुंबईसाठी एक व्हा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com