ज्यांनी आपल्या 26 बहिणींचा कुंकू पुसलं ते आतंकवादी अजून पर्यंत मिळाले नाहीत. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या व्यापार बंद करण्याचा धमकीमुळं आपण युद्ध विराम दिला. विदेश मंत्र्यांनी जे वक्तव्य केलं त्यामध्ये पाकिस्तानला सांगितलं की कुठल्या जागेवर आम्ही हल्ले करणार आहोत. हा प्रकार म्हणजे लहान मुलं खेळ खेळतात त्याप्रमाणे आहे.
ममता बॅनर्जी यांनी जो उल्लेख केला त्यामध्ये अजूनही जनतेमध्ये चिंतेचा विषय आहे. पंतप्रधान विदेश दौरे करतात हजारो करोड रुपयांचा टॅक्स स्वरूपात जनता भरत आहे. पण एकही देश त्या परिस्थितीमध्ये भारतासोबत उभा राहिला नाही. 2019 मध्ये पुलवामाची घटना झाली त्याबद्दल अजून कुठलाही माहिती पुढे आलेली नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी खोटे बोलत असतात असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केला.