
मुंबईच्या पूर्व उपनगरांतील भांडुप आणि मुलुंड या भागांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे अनेक कुटुंबे गावाकडे गेलेली असतानाच चोरट्यांनी संधी साधून बंद घरे टार्गेट करायला सुरुवात केली आहे. या घरफोड्यांचे अनेक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, भांडुपच्या कोकण नगर भागातील एका घटनेत मध्यरात्री चोर घरात शिरताना स्पष्टपणे दिसत आहेत. पोलिसांकडून तपास सुरू असला तरी नागरिकांनी सुरक्षा व्यवस्था वाढवावी आणि शक्य असल्यास शेजाऱ्यांमध्ये सतर्कतेने संपर्क ठेवावा, असा सल्ला दिला जात आहे.