मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जनतेला लाल मातीतील कुस्तीचा थरार बघायला व अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्र तसेच राज्यातील विविध कुस्ती स्पर्धांमध्ये मैदान गाजवून कुस्ती खेळात स्वतःची ओळख निर्माण करणारे कुस्तीवीर या स्पर्धेत सह्भागी होणार असल्याने ‘खासदार केसरी कुस्ती दंगल-२०२५’ हि स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे. २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र दत्ताराम वायकर यांनी कुस्तीचा हा थरार पाहण्याची संधी लोकसभा क्षेत्रातील जनतेला उपलब्ध करून दिली आहे. प्रथमच अश्या प्रकारे कुस्ती स्पर्धा या लोकसभा क्षेत्रात भरवण्यात आली आहे.