अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मिळून शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी हा गट स्थापन केला आहे. या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट चे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांना उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवारी देण्यात आली आहे . आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवकांनी कॉंग्रेस, भाजप यांना सोबत घेत अंबरनाथ विकास आघाडी हा गट स्थापन केला होता . मात्र अचानक या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी अंबरनाथ विकास आघाडीची साथ सोडत शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि त्यांच्यासोबत शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी हा गट रजिस्टर केला आहे .