पुणे: कल्याणीनगर भागातील हॉटेल ‘युनिकॉर्न हाऊस (बजेट रूम)’ मध्ये मध्यरात्री दोन गटात वादावादी झाल्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा पोलिसांनी या पबला सील ठोकले. हॉटेल युनिकॉर्न हाऊस पबमध्ये आणि समोरील रस्त्यावर गुरुवारी (ता. ११) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये वाद झाला होता. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी मध्यरात्री पावणेदोन वाजता घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्री पब बंद करण्यात आला होता. तसेच, आतमध्ये साफसफाईचे काम सुरू होते.