Latest Marathi News Live Update
esakal
जुन्या लोकांना तातडीने घरे देणे तसेच नव्या प्रकल्पांसाठी मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हाउसिंग स्टॉक निर्माण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. महाराष्ट्रात तसेच मुंबईमध्ये वन, कांदळवन, ‘सीआरझेड’ आदी ठिकाणी मूळ स्थितीत पुनर्विकास होऊ शकत नाही. तसेच बऱ्याचशा पायाभूत प्रकल्प जसे की रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणी व मलनिस्सारण प्रकल्प इत्यादींना जलद गतीने पुढे नेण्यासाठी ‘पीएपी’ची गरज भासते. समाजातील गरीब गरजू घटकांना जसे गिरणी कामगार, डबेवाले, माथाडी इत्यादींना घरे देण्याचे धोरण सरकारने स्वीकारलेले आहे. या सर्वांना वेळेवर घरे देता यासाठी मोठ्या प्रमाणात राज्य पातळीवर ‘हाउसिंग स्टॉक’ची आवश्यकता लागणार आहे. म्हणूनच याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे म्हणाले.