होळीच्या धुलीवंदनाला एकमेकांवर रंग टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिचकार्या सध्या बाजारात चर्चेचा विषय ठरल्यात. कारण त्या पिचकारी ऐवजी एकमेकांना मारण्यासाठी जणू हत्यारच लहान मुलांच्या हातात पिचाकऱ्या म्हणून दिल्या जात आहेत, असं एकूण चित्र दिसतंय. कुराड पिचकारी, पिचकारी हातोडा, बंदूक पिचकारी, तलवार पिचकारी सध्या बाजारात आले आहेत. आता या पिचकारी लहान लहान मुलांच्या हातात देऊन जणू एकमेकांवर हल्ला करा असा संदेशच दिला जातोय.