मेट्रो मार्ग 9 आणि 7 अ चे काम पूर्ण करण्यास कंत्राटदाराला एमएमआरडीए कडून मुदतवाढ देण्यात आली आहे. दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल मार्गावरील प्रवास लांबणीवर पडणार आहे. दोन्ही मार्गाचे कार्यादेश 9 सप्टेंबर 2019 रोजी जारी करण्यात आले आहेत.
एमएमआरडीएकडून आता मेट्रो मार्ग 9 साठी जून 2025 तर मेट्रो मार्ग 7 अ साठी जुलै 2026 अशी नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. 9 सप्टेंबर 2019 रोजीच्या कार्यादेशाप्रमाणे मार्ग 9 साठी काम पूर्ण करण्याची तारीख ही 8 सप्टेंबर 2022 अशी होती. तर मार्ग 7 अ ची काम पूर्ण करण्याची तारीख ही 8 मार्च 2023 अशी होती. मुदतवाढ दिल्यामुळं मुंबईकरांना या दोन्ही मार्गिकावरील प्रवास करण्यास आता वाट पाहावी लागणार आहे. ज्यास मुदतवाढ देत आता जुलै 2026 अशी करण्यात आली आहे.