धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेनाचा युक्तीवाद यापूर्वीच पूर्ण झाला आहे. ठाकरे सेनेने धनुष्यबाण चिन्ह जर आम्हाला मिळणार नसेल तर ते गोठवण्याचा युक्तीवाद गेल्या महिन्यात मांडला होता. त्यानंतर ऑगस्टच्या अखेरीस शिंदे सेनेकडून युक्तीवाद सुरू झाला. आजच्या युक्तीवादात काय काय मुद्दे मांडण्यात येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या मालकीवरून गेल्या चार वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीत आता शिंदे सेना बाजू मांडत आहे.