शिरूर-पुणे रस्त्यावर बुधवारी दिवसभर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले. दुपारी तीन ते चारच्या सुमारास रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील महागणपती मंदिरासमोर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भर उन्हात वाहतूकीचा खोळंबा झाल्याने दुचाकीस्वारांचे हाल झाले.