तब्बल 20 वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेले काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारण एकाकी पडले आहेत. त्यांनी गडहिंग्लजमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात स्वतःच असं वक्तव्य केलं. "मी एकाकी पडल्याचे कबूल केलंय. राजकारणात चढउतार होत असतात कधी अनेकजण सोबत असतात तर कधी अनेक जण आपली साथही सोडत असतात, त्यामुळ मी सध्या एकटा जरी पडलो असलो तरी तुम्ही माझ्यासोबत आहात का? असा सवाल त्यांनी समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना विचारला. यावेळी एकच हशा पिकला.