

Latest Marathi News Live Update
esakal
मोतीलाल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पावरून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून म्हाडाकडून रहिवाशांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात १६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांचे आश्वासन देण्यात आले, मात्र “१६०० फूटच का?” असा थेट सवाल अनेक रहिवाशांनी उपस्थित केला. काही नागरिकांनी सादरीकरणादरम्यान गोंधळ घालत २४०० चौरस फूट घरांची मोठी मागणी केली, तर परिस्थिती शांत ठेवण्यासाठी उपस्थितांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, सर्व पक्षांमध्ये चर्चा घडवून आणत तोडगा काढण्याचा प्रयत्न म्हाडाकडून सुरू असून पुनर्विकास प्रक्रियेत मतभेद उफाळून आले आहेत. रहिवाशांच्या वाढीव मागण्यांवर म्हाडा नेमका काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.