
मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर लोखंडी पान्ह्याने जोरदार हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात कुत्रा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोर तरुणाला सायन पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या हल्ल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यात हल्लेखोराची कृती स्पष्टपणे कैद झाली आहे.