वाशिम जिल्ह्यात एक्सप्लोसिव्ह साहित्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी चोरी गेलेल्या विहीर फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे १ लाख ७७ हजार रुपयांच्या डेटोनेटरचा साठा वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सावरगाव बरडे शेतशिवारात छापा टाकत सोयाबीन कुटाराच्या गंजीमध्ये लपवून ठेवलेले सात नायलॉनच्या गोण्यांमधील डेटोनेटर जप्त करण्यात आले. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करत आहेत.