मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली असून शरद शिंदे यांच्यासह अंजली दिघोळे-राठोड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माणिकराव कोकाटे यांना तसच राज्य सरकारला बाजू मांडण्यासाठी २१ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आलीय. कोकाटे यांच्या विरोधात पुढील सुनावणी आता २१ एप्रिलला होणार असून त्यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासन काय लेखी म्हणणं मांडणार? याकडं लक्ष लागून राहिलं आहे.