

Latest Marathi Live Update News
esakal
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या इलेक्ट्रॉनिक संगीत कार्यक्रमानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यापूर्वी समोर आलेल्या अमली पदार्थ प्रकरणानंतर आता मोबाईल चोरीची घटना चर्चेत आली आहे. या कार्यक्रमातून सहा महागडे फोन चोरीला गेल्याची माहिती समोर आली असून त्यामध्ये आयफोन १७, १६ प्रो मॅक्सचे दोन फोन, १५ प्रो मॅक्स, १४ प्रो मॅक्स आणि १७ एअर यांचा समावेश आहे. चोरी गेलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे तीन लाख चाळीस हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी चार तरुण आणि दोन तरुणींनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.