येत्या 24 तासात मुंबई, पुण्यासह, कोकण किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाल्यामुळे पश्चिमेकडे त्याचा जोर अधिक आहे. परिणामी महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणखी 24 तास राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावर असणाऱ्या पर्यटन क्षेत्रावर जाणं टाळावं असं आवाहन सुद्धा हवामान शास्त्रज्ञांनी केलं आहे. पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांच्याशी यासंदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी.