मुंबईत माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्याशी संबंधित घडामोडींचा आज गदारोळ आहे. आज त्यांच्या अँजिओग्राफी टेस्ट थोड्याच वेळात होणार असून, टेस्टच्या अहवालानंतर नाशिक पोलिस पुढील कारवाईवर निर्णय घेतील. त्याचबरोबर, मुंबई हायकोर्टात त्यांनी शिक्षेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर देखील थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. आता सर्वांचे लक्ष हायकोर्टच्या निर्णयावर आहे. कोकाटे यांना दिलासा मिळेल की शिक्षा कायम राहील?