लंडन येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक सांघिक गट ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत जगात पहिल्या स्थानावर असलेल्या चीनच्या 'होऊ ही' ला सेमीफानला पराभूत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरची 'गोल्डनगर्ल' दिव्या देशमुखला ट्विटरवर शुभेच्छा दिल्यात. १८ वर्षीय दिव्याने सेमी फायनलमध्ये चीनची ग्रॅण्डमास्टर होऊला ७४ व्या चालीत मात दिली होती. उल्लेखनीय म्हणजे, ३१ वर्षीय होऊ ही तीनवेळा 'वर्ल्ड चॅम्पियन' राहिली आहे. मात्र, त्यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात दिव्याला पराभवाचा सामना करावा लागल्याने तिचे विजेतेपद थोडक्यात हुकले.