वाघोली (ता. २०) – "आता आरक्षणाशिवाय माघार नाही," असा ठाम इशारा देत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या भावना प्रखरपणे मांडल्या. वाघोली येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, यावेळी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात "कोट्यवधी मराठा बांधव एकवटणार" असून सरकारने वेळेत ठोस निर्णय घेतला नाही, तर जनसागराचा उद्रेक अटळ आहे. यापुढे मराठा समाज थांबणार नाही आणि आरक्षण मिळेपर्यंत लढा अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.