हवामान खात्याने ५ राज्यांसाठी धुक्याचा इशारा जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने रविवारी वायव्य भारत, मध्य आणि पूर्व भारतातील ५ राज्यांसाठी धुक्याचा इशारा जारी केला आहे. "उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणाच्या काही भागात रात्री/सकाळी २१ तारखेपर्यंत दाट ते खूप दाट धुके राहण्याची शक्यता आहे, तर झारखंडमध्ये २१ आणि २२ तारखेला आणि मध्य प्रदेशात २१ डिसेंबरच्या सकाळपर्यंत धुके राहण्याची शक्यता आहे."