पुणेः महापालिका प्रशासनाकडून शहरात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. मात्र, या कारवाईमध्ये परवाना असणाऱ्या, महापालिकेकडे शुल्क भरणाऱ्या पथारी व्यावसायिकांसह सरकारने व्यावसायासाठी परवानगी दिलेल्या दिव्यांगांवर महापालिकेकडुन अतिक्रमण कारवाई केली जात असल्याचा आरोप करत पथारी व्यावसायिक संघटनांनी न्यायालयात दाद मागितली आहे. पथारी व्यावसायिकांवरील चुकीच्या कारवाईयाबाबत संघटनांकडुन महापालिकेला नोटीस पाठविण्यात आलेली आहे.