Latest Marathi News Live Update : मुंबई–नाशिक सत्ता समीकरणांवर भाजप–शिवसेना वाटाघाटी तेजीत
Breaking Marathi News live Updates 21 January 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Nashik Live: मुंबई–नाशिक सत्ता समीकरणांवर भाजप–शिवसेना वाटाघाटी तेजीत
मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील वाटाघाटी सध्या वेग घेत आहेत. मुंबईत भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता चर्चेत आहे. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर सत्तेचा दावा करत असला तरी दोन्ही बाजूंनी तडजोडीचे संकेत दिले जात आहेत.
राजकीय हालचालींनुसार मुंबईत भाजप–शिवसेना युती आकार घेत असताना नाशिकमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत कायम राहण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील महापौरपदावरून तणाव वाढलेला असून शिवसेना अडीच वर्षांचा कार्यकाळ मागत आहे, तर भाजप पाच वर्षे महापौरपद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम आहे.
मुंबईत महापौरपद भाजपकडे राहिल्यास नाशिकमध्ये सेनेला पदांवर तडजोड मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमध्ये महापौरपद भाजपकडेच राहण्याचा अंदाज व्यक्त होत असून उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, प्रभाग समित्या आणि विषय समित्यांची जबाबदारी सेनेला मिळू शकते. दोन्ही शहरांतील सत्तासमीकरणांवर पुढील तासांत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.