Latest Marathi News Live Update : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या दोन गटातील वादावर नागपुरात रात्री बैठक
Breaking Marathi News live Updates 22 January 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Chandrapur Live : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या दोन गटातील वादावर नागपुरात रात्री बैठक
चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या दोन गटांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी नागपुरात काल रात्री महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित आहेत. तर खासदार धनोरकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्यात येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर महानगरपालिकेत गटनेता प्रमुख ठरवण्याचा अधिकार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे राहण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या गटाला उपमहापौर पद देण्यावर चर्चा सुरू आहे. ज्या गटाकडून महापौर निवडले जाणार आहेत, त्या गटाला महापौरपद मिळेल तर उर्वरित दुसऱ्या गटाला स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचा पर्याय समोर येत आहे.
या सर्व मुद्द्यांवर चंद्रपुरातील दोन्ही गट येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. बैठक आटोपून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वाराणसीकडे रवाना होत असल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे.