दिल्लीच्या यापूर्वीच्या आप सरकारनं मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमागे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीकारक भगतसिंग यांच्या प्रतिमा लावल्या होत्या. या प्रतिमा मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक फोटोमध्ये दिसत असतं. पण आता या प्रतिमा दिसणार नाहीत, कारण दिल्लीच्या भाजपच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या प्रतिमा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीमागून हटवल्या असून बाजुच्या भिंतीवर लावल्या आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमागे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा लावल्या आहेत.