Latest Marathi News Live Update
esakal
राज्यात अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरींची दुरुस्ती तत्काळ व्हावी, यासाठी रोजगार हमी विभागाने १८ कोटी ५६ लाखांचा आगाऊ निधी वितरीत केला आहे. शेतकऱ्यांकडे ही कामे सुरू करण्यासाठीही पैसे नसल्याने, ही आगाऊ रक्कम देण्यात आली असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले आहे. राज्यातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोकण ,अमरावती आणि नागपूर या विभागात तब्बल ११ हजार ८१३ विहिरी बुजून गेल्या आहेत.