Latest Marathi News Live Update
esakal
अकोला : मालमत्ता कर वाढ प्रकरणातील मनपाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (ता.२६) सुनावणी घेण्यात आली. दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने वादी व प्रतिवादी दोघांचेही युक्तिवाद ऐकले. त्यानंतर दोन्ही पक्षांना एक आठवड्याच्या आत ‘नोट्स ऑफ आर्ग्युमेंट्स’ अर्थात संक्षिप्त युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याची माहिती देण्यात आली आहे.