भाजपकडून ठाकरे गटाच्या शिवसेनेला धक्का दिल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते नाशिकच्या तपोवन परिसरात झाडांची पाहणी करणार असून, पर्यावरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न दिसून येतो. दुपारी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पहिला कार्यकर्ता मेळावा घेत आदित्य ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.