शहरातील नगर रस्ता, विमानतळ, आळंदी रस्ता यासह अन्य भागातील रस्ते सात झाडण्यासाठी पुणे महापालिकेने ४३ कोटी २० लाख ७६ हजार रुपयांची निविदा मान्य केली आहे. पुढील सात वर्षे ठेकेदाराकडून रस्ते रोड स्वीपर मशिनद्वारे झाडणे, पादचारी मार्ग, दुभाजकाची स्वच्छता करण्याचे काम ठेकेदाराकडून केले जाणार आहे.