राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या यात्रेत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या स्वर्गीय मातोश्रींवर केलेली अशोभनीय टिप्पणी ही "त्यांची" बौद्धिक दिवाळखोरीच दाखवून देते. "आई" हा शब्दच मुळी भगवंतांशी नाते सांगणारा आहे. आई शब्दातच विलक्षण ताकद आहे. या भारतीय शब्दाचे महात्म्य ज्यांना कळत नाही, किंवा कळणार नाही तेच लोक आई विषयी असे अशोभनीय बोलू शकतात. या देशातील कोणत्याही माणसाला कोणाच्या ही "आई"चा अपमान सहन होणार नाही. या देशातील जनतेच्या काळजावर ही एक "जखम" ज्यांनी केली, त्याचे परिमाण त्यांना भोगावे लागतील ! असं आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.