पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीसाठी येणार खर्च पालकांकडून घेण्याचा प्रकार उरुळी देवाचीमधील पालिकेच्या शाळेत उघडकीस आला आहे. या प्रकारामुळx शिक्षण विभागाची चांगलीच नाचक्की झाली आहे. येथील शाळा सध्या पालिकेकडे हस्तांतरित झाली आहे. येथील कारभार पालिकेच्या शिक्षण विभागाकडून पहिला जातो. या शाळेत पिण्याच्या पाण्याची वाहिनी नसल्याने पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अपुऱ्या टँकर पुरवठ्यावर उपाय म्हणून येथील साठवणूक टाकीपासून शाळेतील टाकीपर्यंत वाहिनी करण्यासाठी शाळेतील प्रभारी मुख्याध्यपकांनी थेट प्रत्येक पालकांकडून शंभर रुपये जमा करण्याची युक्ती काढली. मात्र या प्रकारामुळे शिक्षण विभागाची चांगलीच नाचक्की झाली आहे.