राज्य महिला आयोगाने मयुरी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज दि. २८ मे २०२५ रोजी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी अहवाल सादर करत पोलीस तपासाची माहिती दिली आहे. पोलीस तपासानंतर महिला अत्याचारासंबंधीच्या या प्रकरणी गुन्ह्याची निर्गती ६० दिवसात होणे अपेक्षित असताना दोषारोपपत्र विहित मुदतीत मा. न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याची गंभीर बाब अहवालात निदर्शनास आली आहे