वर्गात घुसून एका शिक्षिकेला धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याची घटना लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश अंबिके (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या संदर्भात एक ४० वर्षीय पीडित शिक्षिकेने फिर्याद दिली आहे.