Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 29 November 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updates esakal
Updated on

कडाक्याच्या थंडीतही रस्त्यासाठी उपोषण सुरूच

बीड, धारूर तालुक्यातील हसनाबादपासून ते राज्य मार्ग क्र.२३२ पर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरी रस्ता मंजूर आहे. सदरील रस्त्याचे काम प्रगतीपथावर असताना काही शेतकऱ्यांनी हा रस्ता जाणूनबुजून अडवला असून यामुळे रस्त्याचे काम थांबले आहे. हा रस्ता तात्काळ व्हावा यासाठी हसनाबाद ग्रामस्थांनी तहसीलदार यांना ता.२७ रोजी निवेदन देत पुढील दोन दिवसात मार्ग नाही निघाला तर उपोषणाला बसणार, असे निवेदन दिले होते. तहसीलदार यांनी कुठलीच कार्यवाही केली नसल्याने दि. २९ रोजी ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाकडे तहसीलदार यांनी पाठ फिरवल्याने ग्रामस्स्थाचे कडाक्याच्या थंडीत देखील उपोषण सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com