नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये गळती आढळल्यामुळे रविवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी ८ ते १० तासांचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांना पाणी वापराची काटकसरी करण्याचे पालिका प्रशासनाचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे सोमवारी सकाळी देखील शहरात पाणी कमी दाबाने पुरवठा होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा संयमित वापर करण्याची खबरदारी घ्यावी.