मराठी भाषेच्या नावाखाली, उत्तर भारतीयांविरुद्ध द्वेष आणि हिंसाचाराचे राजकारण केले जात आहे. मुंबईत उपजीविका करण्यासाठी येणाऱ्या निष्पाप गरीब लोकांना निर्दयीपणे मारहाण केली जात आहे. ही गुंडगिरी फक्त गरिबांवरच होत आहे, कोणत्याही मोठ्या कॉर्पोरेटवर नाही! मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना आवाहन करतो की त्यांनी संसदेत द्वेषाचे हे राजकारण उपस्थित करावे आणि 'सबका साथ, सबका विकास' या कथित धोरणावर सरकारला प्रश्न विचारावेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतो की या गुंडांवर कठोर कारवाई करावी! असं समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी म्हटलं आहे.