शुक्रवार (ता. २९) रोजी राज्यभरात कोसळल्या मुसळधार पावसाने आज (शनिवार ता. ३०) काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून आले. त्यांनतर उद्या म्हणजेच रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाश राहणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० अंश सेल्सिअस आणि २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच किनारी भागात अतिवृष्टी आणि भरती-ओहोटीमुळे स्थानिक पूर येण्याचा धोका वाढू शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.