रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे सचिव सुमित वजाळे आणि शेकडो आरपीआय तसेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चुनाभट्टी येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या कार्यक्रमासाठी मंत्री भरत गोगावले उपस्थित होते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दाखल होणार आहेत. या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.