Latest Marathi News Live Update
esakal
आडूळ, ता. ३० (बातमीदार) – आडूळ (ता. पैठण) व परिसरात सोमवारी (ता. ३०) सायंकाळी सुमारे ६ वाजल्यानंतर अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.