महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील सहा सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या लवकरच राज्य सरकारकडून भरल्या जातील असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून, त्याबाबत विचारले असता त्यावर फडणवीसांनी स्मित हास्य करत यावर भाष्य करणे टाळले.